हे महागणार :
१. कार आणि बाईक: वाहन उद्योगाला लागणाऱ्या उत्पादन खर्चांमध्ये वाढ झाल्यामुळे कार आणि बाईक महाग होणार आहेत.
२. मोबाईल आणि चार्जर: मोबाईल आणि त्याच्या असणाऱ्या एक्सेसीरिजवरील कर हा शून्यावरून २.५ टक्के करण्यात आल्याने आता आजपासून त्यांच्या किमतीत वाढ होणार आहे.
हे नियम बदलणार:
१. बँकांचे विलीनीकरण:
देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्र बँक, ओरिएण्टल बँक आणि अलाहाबाद बँक आजपासून इतर बँकामध्ये विलीन होणार आहेत. त्यामुळे आजपासून या बँकांचे पासबुक आणि चेकबुक रद्दबातल ठरवले आहे.
२. ईपीएफवर आजपासून भरावा लागेल इन्कम टॅक्स:
भविष्य निर्वाह निधी खात्यात जर एखाद्याची २.५ लाखांपेक्षा जास्त निधी असेल तर त्यावर आता प्राप्तीकर भरावा लागणार आहे. याचा सर्वात जास्त फटका ईपीएफ मध्ये गुंतवणूक करणार्यांना होणार आहे .
३. एलटीसी योजना:
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आजपासून 'लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन' प्रणाली लागू होत असून याचा खूप मोठ्या प्रमाणात केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून त्यांना एखाद्या गोष्टीच्या खरेदीवर 'एलटीसी कॅश व्हाऊचर'चा वापर करता येणार आहे.
#Bank #EPF
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.